Friday 2 January 2015

घोसाळगड उर्फ वीरगड

महाराष्ट्रातील अपरिचीत किल्ल्यांपैकी एक असलेल्या घोसाळगडाविषयी :-
"रायगडमधील घोसाळगड"
घोसाळगड उर्फ वीरगड
हा किल्ला रायगड जिल्ह्यात आहे.
दुर्गसंपन्न असलेल्या कोकणातील रायगड
जिल्ह्यात रोहे तालुक्यात
घोसाळगडचा किल्ला आहे. मुंबई-पुणे या महानगराशी रोहे गाडीमार्गाने जोडले गेले आहे. शिवकालापासून प्रसिध्द असलेले रोहे गाव
कुंडलिका नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले आहे. मुंबई-पणजी महामार्गाच्या पश्चिमेकडे असलेल्या रोहे येथे जाण्यासाठी महामार्गावरील
नागोठाणे तसेच कोलाड येथून फाटे आहेत.
रोहे येथून मुरूड या सागरकिनार्यावरी
ल गावाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यापैकी एक चणेरे, बिरवाडीकडून कुंडलिका नदीच्या किनार्याने जातो. तसेच दुसरा मार्ग घोसाळगडकडून भालगाव मार्ग जातो. याच मार्गावर घोसाळगडचा किल्ला आहे.
चारहि बाजूंनी लहान-
मोठ्या डोंगरांच्यामधे घोसाळगड विराजमान झालेला आहे.
समुद्रसपाटीपासून २६० मीटर उंच असलेल्या घोसाळगडचा आकार दुरून शिवलिंगासारखा भासतो. रोहे एस. टी. स्थानकावरून
घोसाळगडला जाण्यासाठी एस. टी. बसेसची सोय आहे. गडाच्या पायथ्याजवळ गाव आहे.
गावातूनच गडावर जाण्याचा मार्ग आहे.
रस्ता संपल्यावर पायर्याँचा मार्ग केलेला आहे. या पायर्याँच्या मार्गावर
भवानी मातेचे मंदिर आहे. पुढे गणपतीचे प्रशस्त मंदिर आहे. येथून पंधरा मिनिटांत तटबंदीजवळ पोहोचता येते. कातळात
कोरलेल्या पायर्या दिसतात. येथून
दरवाजापर्यँत जाता येते. प्रवेशद्वार नष्ट झाले आहे. याचे काही अवशेष येथे आहेत. या अवशेषांमध्ये
वाघांची चित्रेही कोरलेली आहेत. गडाच्या माथ्यावरून तळागडाचे दर्शन होते. कुडे मांदाडच्या खाडीचे द्रश्य
आपल्याला खिळवून ठेवते. शिवकालामध्ये
स्वराज्यात असलेला घोसाळगड पूर्वी निजामशाहीमध्ये होता. गडदर्शन करून आल्या वाटेने उतरून परतीचा मार्ग पकडता येईल.
माहिती साभार : दै.पुढारी (सांगली)
दि. २५ डिसेँबर २०१३
गडवाट

No comments:

Post a Comment