Friday 2 January 2015

सुवर्णदुर्ग किल्ला

सुवर्णदुर्ग किल्ला
इ.स.१६६० मध्ये महाराजांनी सुवर्णदुर्ग किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला आणि किल्ल्याची डागडुजी केली.दर्याराजे कान्होजी आंग्रे यांनी सुवर्णदुर्गाच्या बळावर सागरावर आपले वर्चस्व गाजविले.सुवर्णदुर्ग हा जलदुर्ग हर्णेच्या बंदराजवळ वसलेला आहे.
किल्ल्याच्या महाद्वाराजवळ पायरीवर कासवाचं शिल्प आहे, तर उजव्या बाजूला तटबंदीवर हनुमानाची मुर्ती कोरलेली आहे. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकराच्या दोन देवड्या आहेत. सुवर्णदुर्गाच्या आत विहिरी तसेच पडझड झालेले वाड्याचे अवशेष आहेत.
गडावरची तटबंदी आजही मजबूत अवस्थेत उभी आहे.गडावर एकून सात विहिरी आहेत.सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णेच्या किनार्‍यावर आणखी तीन सागरी दुर्गांची उभारणी करण्यात आलेली आहे,ते तीन दुर्ग म्हणजे कनकदुर्ग,फत्तेदुर्ग आणि गोवागड.सुवर्ण दुर्गाच्या किनाऱ्यावर या दुर्गाचे दर्शन होते.एका तासात किल्ला पाहून होतो.
गडावर जाण्या-येण्याची तसेच राहण्या-खाण्याची व्यवस्था
मुंबई-गोवा महामार्गावर खेड ला उतरावे.तेथून दापोलीहून हर्णला.हर्णे बंदरातून,होडीतून सुवर्णदुर्गावर जाण्यासाठी साधारण २० मिनिटं लागतात.
गडावर राहण्याची तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही,जेवणाची व्यवस्था स्वत: करावी.

No comments:

Post a Comment