Friday 2 January 2015

संभाजी राजा

औरंगजेब थयथया नाचवलाय ...
पोर्तुगीज वाकवलाय ...
इंग्रज झुकवलाय ...
सिद्दी पार अडवा केलाय ...
एक नाही दोन नाही पाब्बर १२ घोडांवर निकराचे पंजेफाड करत सेना धुरंदर सर्जा संभाजी अजिंक्यच राहिलाय.
गोव्यावर हल्ला केला. पार मांडवी नदी तुडवून संभाजी राजे गोव्यात घुसणार. तो व्हाईसराय पार पार वैतागला. गोवा हि राजधानी सोडून त्याने दुसरीकडे राजधानी बनवण्याचा डावही मांडला.
इंग्रजांशी तह केला.
इंग्रजांची मस्ती पुरती जिरवली. सरळ केजरी नावाच्या गवर्नरला सांगितल,
“मुंबई विकत दे आणि चल चालू पड”.
अरे जर संभाजी राजांनी त्यावेळी तहात मुंबई विकत घेतली असती ना, तर १५० वर्ष इंग्रजांचे पाय आमच्या छाताडावर नाचालेच नसते. इंग्रजांचा धोका ओळखला होता ना तो या सर्जा सभाजींनी.
पोर्तुगीजांच उभ राज्य संभाजी राजांनी पार उध्वस्त केल.
कधी हरला नाही...
माग फिरला नाही...
तह केला नाही...
नमला नाही...
झुकला नाही...
वाकला नाही... अजिबात नाही...
जो झेपावत राहिला अति उत्साहान..
अफाट ताकतीन..
प्रचंड शौर्यान..
आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत याचा धारणेन..
जगवत राहिला स्वराज्य... संवर्धित करत राहिला स्वराज्य... अफाट ताकतीन..
अरे एवढंच नाही कर्नाटकात गेलेत.
कर्नाटक मुठीत घेतलय. तंजावर पर्यंत मराठी राज्याच्या सीमा भिडविल्या. त्रीवेन्दिरम, त्रीचीनापल्ली, कावेरी नदी ओलांडलीये, तो पाशानकोट जिंकलाय, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मद्रास कुठवर कुठवर झेप मारली या सर्जा संभाजींनी.
कधी रायगड, कधी पन्हाळा, कधी गोवा, कधी जंजिरा, कधी त्रीचीनापल्ली, कधी पाशानकोट. अरे वाऱ्यासारखा फिरतोय नुसता. दिवसाच्या २४ तासांपैकी २० तास घोड्यावर मांड टाकून लढायचा. प्रसंगी शाडूच्या मातीच्या भाकरी खायचा. पण मराठी राज्यासाठी अफाट ताकतीन झुंजत राहायचा.
“अरे तलवारीच्या टोकावर मरण घेऊन हिंडतात मराठे. औरंगजेबा तुला मारायला वक्त नाही लागणार.
आई भवानीचे राज्य हे, नको हात घालूस.
” गर्जत राहिला... बरसत राहिला... संभाजी राजा.

No comments:

Post a Comment