Friday, 2 January 2015

छत्रपती संभाजी राजेंच्या चरणी

छ : छंद तुझा करी मृत्युला बेधुंद
त्र : त्रस्त झाला मृत्यु पाहुन डोळे लालबुदं
प : पचवीले विष तु धर्मासाठी
ती : तीर्थस्वरुप दैवत मराठ्याचें
रा : राखीला धर्म तु आमच्यासाठी
जे : जेव्हां कोपला सैतान तुटला स्वराज्यावर
सं : संभाळली दौलत मराठी तळहातावर
भा : भागवीली तहान शत्रुच्या रक्तावर
जी : जीवाशि खेळनाऱ्या शिवबाचा तु पुत्र
म : मशाल तुच क्रांतीची बलीदानाचे सुत्र
हा : हार न मननारा
रा : राजाच राजेपन जाणनारा
जा : जातीचा वाघ तु मर्द मराठा
ना : नाही जन्मला असा तुच एकटा
मा : माघार नाही मंजुर तुला
ना : नाही सैतानापुढे तु झुकला
चा : चारही दिशा तुझाच धाक...
मु : मुगलाचां तु एकमेव बाप
ज :जय जय जयकार तुझा
रा : राजा एकटा शंभु माझा..

छत्रपती संभाजी महाराज
यांच्या 'बलीदानदिना'
च्या निमित्ताने...
1. जगातील पहिले बुलेट पृफ जॉकेट युद्ध भूमीवरील गरज लक्षात घेऊन
फक्त एका महिन्यात तयार करणारा
2. जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार करणारा
3. जंजिरा जिंकण्यासाठी उसळत्या सागरात ८००
मीटर सेतू बांधणारा
4. आदिलशाही ,कुतुबशाही एकजूट करणारा आणि त्याच
वेळी सिद्धी ,पोर्तुगीज व इंग्रजाना त्यांच्या बिळातकोंडून ठेवणारा त्याच
वेळी मोघलानचा गर्दनकाळ ठरलेला
5. दुष्काळ ग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून डोंगर पोखरून
जल नियोजन करणारा .
6. उत्तर प्रदेशपासून दूर तामिळनाडूकर्नाट क आणि राजस्थान प्रांतातील
लोकांनाही स्वराज्यासाठी एकत्र करणारा
7. इतर धर्मांचा मान सन्मान करणारा आणि धर्मातरावर कायदेशीर
बंदी घालणारा
8. बालमजुरी व बेट बिगरि विरुद्ध कायदा करणारा
9. शिवप्रभुंची इच्छा पूर्णकरण्यासाठी राज्याभिषेक झाल्यावर पंधरा दिवसात
दूर मध्य प्रदेशातील बुर्हाणपूरवर छापा घालणारा
10. स्वराज्याला आर्थिक संपन्न ठेवणारा
11. देहू ते पंढरपूर आषाढीला संरक्षण व अर्थ पुरवठा करणारा
12. दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना शेतीसाठी पिक कर्ज योजना राबविणारा
13. सैनिकांच्या उत्पनाला इतर मार्गाने हातभार लागावा म्हणून
चरईची सवलत कायम ठेवणारा
14. आपले आरमार सुसज्ज करण्यासाठी परदेशातून तंत्रज्ञान व प्रशिक्षित
लोकांचे सहकार्य घेणारा
15. स्वत:चे आधुनिक बारुदखाने तयार करून स्वदेशीचा महामंत्र देणारा
आपला शंभू राजा........... ....
काळोखातूनी विजयाचा हे पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्यूंजय वीरा...
!*जय छत्रपती शिवराय...!
।जय छत्रपती संभाजी राजेंच्या चरणी
मानाचा त्रिवार मुजरा !*****



कसा होता आमचा शंभुराजा

कसा होता आमचा शंभुराजा..!!
* १४ मे १६५७ रोजी पुरंदरावर जन्माला आलेला युगंधर म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या दुसर्या वर्षी आईविना पोरका झालेला बाळ म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या नवव्या वर्षी ४ हजारांची मनसबदारी स्वीकारणारा म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या दहाव्या वर्षी आग्र्याच्या भेटीला जाणारा शिवपुञ म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या अकराव्या वर्षी ५ हजारांची मनसबदारी स्वीकारणारा म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या तेराव्या वर्षी रायप्पा महाराचा भर दरबारात सत्कार करणारा म्हणजे शंभुराजा.
*वयाच्या चौदाव्या वर्षी महान बुधभुषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिणारा संस्कृतपंडीत म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या पंधराव्या वर्षी वेगवेगळ्या भाषेतील तीन महान ग्रंथ लिहिणारा म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या सोळाव्या वर्षी १० हजार सैनिकांचे नेतृत्व करणारा कुशल सेनानी म्हणजे शंभुराजा.
*वयाच्या सतराव्या वर्षी फोंडा किल्ला घेण्यासाठी शिवरायांना सहकार्य करणारा म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या अठराव्या वर्षी शिवरायांच्या गादीचा पहिला युवराज म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या एकोणिसाव्या वर्षी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची जगातील पहिली पालखी देहू ते पंढरपूर ही पहिली वारी सुरू करणारा म्हणजे शंभुराजा.
*वयाच्या तेविसाव्या वर्षी शिवरायांच्या गादीवर बसणारा दुसरा छञपती म्हणजे शंभुराजा.
* वयाच्या तेविसाव्या वर्षापासुन बत्तीसाव्या वर्षापर्यंत इंग्रज, पोर्तूगीज, फ्रेँच, डग आणि मोगल या पाच सत्ताधार्यांशी लढणारा म्हणजे शंभुराजा.
आणि
* वयाच्या बत्तीसाव्या वर्षी छञपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी,आणि स्वाभिमानासाठी आपल्या देहाचे बलिदान करणारा शुरवीर योद्धा म्हणजे आमचा शंभुराजा****छत्रपती संभाजी राजेंच्या चरणी मानाचा त्रिवार मुजरा !

शिवशाही

क्षत्रियाचे रुधिर ठिबके शिवलिंगावरी
नरव्याघ्र निर्मिले हाती पाजळल्या समशेरी
खंडो खोपड्यासम कैक तोडले षंढ
सह्याद्रीवर निर्मिली भगवी सत्ता अखंड
दिसतात अजुनही डाग रक्ताचे त्या दगडावरी
अफजल फाडून मायभूस अभिषेकले कृष्णेतीरी
हा मावळा घालतो मुजरा राजं तुम्हास तीन हाती
एका सुर्याने पेटवल्या करोडो स्वातंत्र्य ज्योती
राजदंड हाती घेतला अवतरली शिवशाही भुवरी
झुकल्या-वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरी
मुजरा.......राजं..........मुजरा

!! छत्रपति संभाजीराजे भोसले !!

संभाजीराजे भोसले (१४ मे, इ.स. १६५७; पुरंदर किल्ला, पुणे जिल्हा, महाराष्ट्र - ११ मार्च, इ.स. १६८९; तुळापूर, महाराष्ट्र) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते....1)लहानपण.....संभाजीराजांचा जन्म १४ मे, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आई बनली. संभाजीचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. सुरुवातीच्या काळात त्यांच्या सावत्र आई, सोयराबाई यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली.
अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. मोंगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज आग्‍ऱ्याच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मोंगली सैनिकांचा संभाजीराजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते स्वराज्यात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले..2).तारुण्य आणि राजकारन .इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना जिंकून घेतले.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात जिजाबाईंचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते.
सळसळत्या रक्ताच्या तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. संभाजीराजांचा महाराजांचे अमात्य अण्णाजी दत्तोंच्या कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले. पण संभाजीराजांना ते मान्य होणे कठीण होते. एकदा भर दरबारात अण्णाजी येताच संभाजीराजांनी, 'आबासाहेब, हे बघा आपले लबाड अमात्य आले' असे उद्गार काढल्याचे इतिहासात नमूद केले आहे. या कारणांमुळे अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजीराजांच्या विरोधात गेले.
सोयराबाई आणि दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले. अफझलखान, शाहिस्तेखान यांच्यासारख्या बलाढ्य शत्रूंना खडे चारणारे युगपुरुष शिवाजी महाराज घरातील बेबनावापुढे दुर्दैवाने हतबल ठरले. आपल्याला दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले गेल्याचा सल संभाजीराजांच्या मनात कायम राहिला.
शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांनी दुष्काळग्रस्त प्रजेकडून एक वर्ष करवसुली न करायचा निर्णय घेतला. तेव्हा सोयराबाई आणि दरबारातील मानकऱ्यांनी संभाजीराजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत आणि राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत असा प्रचार सुरू केला. सोयराबाईंची अपेक्षा होती की शिवाजी महाराज राज्याचे वारस म्हणून राजारामांचे नाव जाहीर करतील....3).साहित्यिक संभाजीराजे..अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत चा उत्तम जाणकारही होता. संभाजी महाराजांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ, तर नायिकाभेद, नखशीख आणि सातसतक हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले. बुधभूषण या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत आपले वडील शिवाजीराजे यांचा उल्लेख आहे:
कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: ।
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: ॥
अर्थ-"कलिकालरूपी भुजंग घालितो विळखा,करितो धर्माचा ऱ्हास
तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल, त्या शिवप्रभूंची विजयदुंदुभी गर्जू दे खास ॥ 4).."मोगल सरदार...या सगळ्या घडामोडींमुळे संभाजीराजे अत्यंत व्यथित झाले आणि त्यांनी शिवाजी महाराजांचे स्वराज्य सोडून औरंगजेबाचा सरदार दिलेरखानाला सामील व्हायचा निर्णय घेतला. त्यांना पुढे करून दिलेरखानाने स्वराज्यातील भूपाळगड या किल्ल्यावर हल्ला केला. किल्लेदार फिरंगोजी नरसाळाने किल्ला नेटाने लढवला पण शत्रुपक्षात युवराज संभाजीराजे आहेत हे कळताच शरणागती पत्करली. संभाजीराजांनी गडावरील सैनिकांना सुरक्षितपणे जाऊ द्यायची मागणी दिलेरखानाकडे केली. पण विजयोन्मादाने हर्षभरित झालेल्या दिलेरखानाने ७०० मराठी सैनिकांचा प्रत्येकी एक हात तोडायचा आदेश दिला. संभाजीराजांना त्याचा भयंकर संताप आला. त्यानंतर दिलेरखानाच्या सैन्याने अथणीवर हल्ला करून तेथील जनतेवर अनन्वित अत्याचार केले. संभाजीराजांनी दिलेरखानाकडे या अत्याचारांचा जाब विचारला. पण दिलेरखानाने त्यांना जुमानले नाही. संभाजीराजांना त्यांची चूक कळली आणि ते विजापूरमार्गे स्वराज्यातील पन्हाळगडावर येऊन दाखल झाले. ते स्वराज्यापासून सुमारे एक वर्ष दूर होते.
संभाजीराजांचे स्वराज्य सोडून जाणे शिवाजी महाराजांना जिव्हारी लागले. त्यांनी त्यांची पन्हाळगडावर भेट घेतली. त्यांनी संभाजीराजांना शिक्षा केली नाही. संभाजीराजांची त्यांनी स्वतः समजूत काढली. मात्र संभाजीराजांच्या स्वराज्य सोडून जाण्यामुळे त्यांच्यात आणि सोयराबाई, अण्णाजी दत्तो आणि इतर मानकऱ्यांमधील दरी अजूनच रुंदावली. सोयराबाईंनी संभाजीराजांना राजारामाच्या विवाहासाठी रायगडावर बोलावले नाही. शिवाजी महाराजांचे राजारामाच्या विवाहानंतर काही दिवसात निधन झाले. ही बातमी सोयराबाईंनी संभाजीराजांना पन्हाळगडावर कळवलीच नाही.
सोयराबाई आणि अण्णाजी दत्तो यांनी संभाजीराजांना पन्हाळगडावर कैद करायचा हुकूम पन्हाळ्याचा किल्लेदारास सोडला. त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा त्यांचा डाव होता. या अवघड प्रसंगी सरनोबत हंबीरराव मोहिते यांनी संभाजीराजांची बाजू घेतली. वास्तविक हंबीरराव मोहिते हे सोयराबाईंचे सख्खे बंधू होते. पण संभाजीराजे हे गादीचे हक्काचे वारसदार होते. तसेच शिवाजी महाराजांच्या अखेरच्या दिवसात लवकरच औरंगजेब सर्व सामर्थ्यानिशी स्वराज्यावर हल्ला करणार अश्या बातम्या येत होत्या. अशा प्रसंगी संभाजीराजांसारखा खंबीर राजा गादीवर असणे गरजेचे होते. राजारामासारखा अननुभवी राजा अशावेळी असणे दौलतीसाठी हानिकारक ठरेल याची हंबीररावांना जाणीव होती. हंबीररावांनी सैन्याच्या मदतीने कट उधळून लावला आणि अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना कैद केले. मोरोपंत पेशव्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध सोयराबाई आणि अण्णाजी दत्तो यांनी कटात सहभागी केले होते......
शिवछत्रपति संभाजीराजे याना मानाचा मुजरा ......

शंभुराजे कृत नखशिख मधील श्लोक

शंभुराजे कृत नखशिख मधील श्लोक
श्री गणजूलिखिते संभूकृत नखशिख
पद पद पत्र सम चरण जंघ जिमी कनक कर मकर ॥
नाभी ललित गभीर, उदर लंबित विसाल वर॥
उर दीरघ अति मंजु चारि कर, देत चारि फल॥
एक दंत अरू सुंड लषत, हरि जात सकल मल॥
अति नैन चारू ढाली फलक श्रवन सीस छविसों मढत ॥
ग्यान होत अग्यान के सो गननायक गुन पढत ॥
अर्थ: गणेशाचे पाय हे कमलपात्राप्रमाणे समचरण ,
जांघ सोनेरी माशांची बनविलेली असून,
नाभी खोल तर पोट लांब आहे.गणेशाची छाती अत्यंत विशाल असून चार हात धर्म, अर्थ, काम व मोक्ष आहेत.
एक दात आणि सोंड ही सगळ्या पापाचे हरण करीत आहेत.
अत्यंत सुंदर डोळे,मोकळे कान व शिर्ष सौंदर्याने नटवलेले आहे.
गणेशाचे गुणगान केल्यामुळे अज्ञानी मनुष्यही ज्ञानी होतो.

!! जय शिवराय !!

पैज प्रतिपाल भर भुमीको हमाल,
चहु चक्कको अमाल भयो दंडक जहानको !!
साहीन की साल भयो, ज्वार को जवाल भयो,
हर को कृपाल भयो, हर के विधानको !!
वीर रस ख्याल सिवराज भू-अपाल तेरो,
हाथके बिसाल भयो भूषण बखानको !!
तेज तरवार भयो, दख्खनकी ढाल भयो,
हिंदुकी दिवार भयो, काल तुरकानको !!
काल तुरकानको !! काल तुरकानको !!
काल तुरकानको !! काल तुरकानको !!
- कविराज भूषण
अर्थ :
शिवराज भूपाल - प्रतिज्ञा पूर्णत्वास पोचवणारा, भूमीभार शिरावर घेणारा, चहूं दिशांच्या राज्यांवर अम्मल गाजवणारा, जगतास शासन करणारा, तसेच बादशहास शल्ल्याप्रमाणे जाचणारा, (प्रजेची) पीडा हरण करणारा आणि नरमुण्डमाला अर्पण करण्याच्या विधीने महादेवावरही कृपा करणारा असा झाला. भूषण म्हणतो तूझी तरवार दख्खनला ढालीप्रमाणे व हिंदूंना भिंतीप्रमाणे रक्षण करणारी झाली असून तुर्कांन्ना (ईस्लामला) मात्र प्रत्यक्ष काळ झाली आहे. वीररस प्रिय अशा शिवरायाच्या विशाल भुजांचे (ज्या स्वत: शक्ती संपन्न असून इतरांनाही शक्ती देणार्‍या आहेत) कोण वर्णन करू शकेल?

शिवछत्रपतींचे अष्टप्रधान मंडळ

* शिवछत्रपतींचे अष्टप्रधान मंडळ *
शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटीत प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवरायांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक स्वराज्य उभे केले. आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. शिवरायांनी निर्माण केलेल्या आदर्श संहिते मधील आणखी एक पैलू म्हणजे अष्टप्रधान मंडळ !
' अष्टप्रधान ' हा शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकला असेल. परंतु हे अष्टप्रधान कोण होते, त्यांचे अधिकार काय होते याची माहिती पुढीलप्रमाणे-
१) मुख्यप्रधान अर्थात पेशवे :-
राजानंतर अधिकाराने सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे पेशवे. राजाच्या गैरहजेरीत सर्व कारभार प्रधान सांभाळीत असत.राज्याची एकंदर व्यवस्था सुरळीत आहे कि नाही हे पाहणे तसेच वेळ आल्यास युद्धात नेतृत्व करणे, सैन्य घेऊन नवीन प्रदेश जिंकणे अशी विविध कामे प्रधानांकडे असत.खलीत्यांवर, पत्रांवर राजाच्या शिक्क्यानंतर पेशव्यांचे शिक्कामोर्तब होई. मोरोपंत पिंगळे हे पहिले पेशवे होते.
२) अमात्य :- आजच्या भाषेत अमात्य म्हणजे अर्थमंत्री किंवा finance minister. राज्यातील एकंदर जमाखर्चांवर अमात्यांचे नियंत्रण असे. रामचंद्र नीलकंठ मुजुमदार हे अमात्य होते.
३) सेनापती उर्फ सरनौबत :- संपूर्ण लष्करावर सेनापतीचे नियंत्रण असे. लष्कराचा कारभार, सैनिकांचे वेतन, युद्धात जे पराक्रम गाजवतील त्यांचा छत्रपतींच्या हस्ते सत्कार, युद्ध प्रसंगी नेतृत्व इ. कामे सेनापतींच्या अधिकारात असत. लष्कराचे घोडदळ आणि पायदळ असे दोन मुख्य प्रकार होते. हंबीरराव मोहिते हे सेनापती होते. यांचे मूळ नाव 'हंसाजी मोहिते'. ' हंबीरराव' हि महाराजांनी त्यांस दिलेली पदवी आहे.
४) सचिव :- सचिव म्हणजे सेक्रेटरी. सरकारी दफ्तरावर सचिवाची देखरेख असे.सर्व पत्रव्यवहार सचिवाच्या खात्याकडून होत असे. अण्णाजी दत्तो हे सचिव होते.
५) मंत्री :- राजाचे आमंत्रित पाहुणे तसेच भेटीस येणारे लोक यांचे स्वागत करणे, बारा महाल, अठरा कारखाने यांचा बंदोबस्त ठेवणे, राजांच्या दिनचर्येची नोंद ठेवणे इ. मंत्र्याची कामे असत.राजाची राजकीय बाजू सांभाळणे तसेच खासगी सल्लागार म्हणून मंत्र्याची नियुक्ती असे.दत्ताजी त्रिंबक वाकनीस हे मंत्री होते.
६) सुमंत किंवा डबीर :- सुमंत म्हणजेच सोप्या भाषेत परराष्ट्र व्यवहार मंत्री किंवा external affairs minister.परराष्ट्र संबंधित सर्व व्यवहार सुमंत पाहत असत. परराष्ट्र राजकारण पाहणे,अन्य राज्यांमधून येणाऱ्या वकिलांची बडदास्त ठेवणे,परराष्ट्राशी होणारा पत्रव्यवहार सांभाळणे ही मुख्यतः सुमान्ताची कामे होत.रामचंद्र त्रिंबक हे सुमंत होते.
७) न्यायाधीश :- न्यायाधीश या शब्दातूनच याचे अधिकार स्पष्ट होतात. निराजी रावजी हे न्यायाधीश होते.
८) पंडितराव :- धार्मिक बाजू सांभाळण्याचे काम पंडितराव किंवा न्यायशास्त्री कडे असे.मोरेश्वर हे न्यायशास्त्री होते.
शिवरायांच्या याच अष्टप्रधान मंडळाच्या धर्तीवर भारतीय राजकारणातील मंत्रीमंडळाची रचना केली आहे. 350 वर्षापूर्वी महाराजांनी केलेली कृती आजही व भविष्यकाळातही मार्गदर्शक म्हणून ठरणार आहेत.