Friday, 2 January 2015

प्राकृतिकदृष्टय़ा भारताचे विभाजन

प्राकृतिकदृष्टय़ा भारताचे विभाजन पुढील पाच प्रकारे करतात. १) उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश २) उत्तर भारतीय मदानी प्रदेश ३) भारतीय व्दिपकल्पीय पठारी प्रदेश ४) भारतीय किनारी मदानी प्रदेश ५) भारतीय बेटे. 
उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश : हिमालय, भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे. सिंधू नदी व ब्रह्मपुत्रा नदीच्या घळ्यांदरम्यान हिमालयाच्या तीन समांतर पर्वतरांगा असून त्यांना बहिरवर्क आकार प्राप्त झाला आहे.
हिमालय पर्वताच्या रांगा : १) ट्रान्स हिमालय : ब्रहद् हिमालयाच्या उत्तरेस ट्रान्स हिमालयाच्या रांगा आहेत. ट्रान्स हिमालयाचा विस्तार 
पश्चिम - पूर्व दिशेने असून त्याची सरासरी लांबी १००० किमी इतकी आहे. ट्रान्स हिमालयात खालील रांगांचा समावेश होतो. अ) काराकोरम रांगा, ब) लडाख रांगा, क) कैलास रांगा.
अ) काराकोरम रांगा : भारतातील सर्वात उत्तरेला असलेल्या या रांगांमुळे भारताची अफगाणिस्तान आणि चीनसोबत सरहद्द निर्माण होते.
काराकोरमचा विस्तार पामीरपासून पूर्वेकडे गीलगिट नदीच्या पूर्वेला ८०० किमी. पर्यंत आहे. जगातील सर्वात उंचीचे २ नंबरचे आणि भारतीय सरहद्दीमधील सर्वात उंच शिखर के - २ ( गॉडविन ऑस्टीन) याच रांगेमध्ये आहे. जगातील काही मोठय़ा हिमनदीची निवासस्थाने या रांगेत आहेत. उदा. सियाचीन, बाल्टेरो, बायाफो, हिस्पर. काराकोरम रांगेत अतिशय उंच अशी शिखरे आहेत. काही शिखरांची उंची ८००० मी. पेक्षा जास्त आहे.
लडाख रांग : सिंधू नदी आणि तिची उपनदी श्योक यांच्यादरम्यान लडाख रांग आहे. लडाख रांगेची लांबी ३०० किमी आणि सरासरी उंची ५८०० मी. आहे.
कैलास रांग : लडाख रांगेची शाखा पश्चिम तिबेटमध्ये कैलास रांग या नावाने परिचित आहे. सर्वात उंच शिखर कैलास आहे.
बृहद् हिमालय (Greater Himalaya) : वैशिष्टय़े : १) लेसर हिमालयाच्या उत्तरेकडे भिंतीसारखे पसरलेले बृहद् हिमालयाची रांग आहे. बृहद् हिमालय हा मुख्य मध्यवर्ती प्रणोदामुळे (MCT-Maincentral Thrus) लेसर हिमालयापासून वेगळा झाला आहे. बृहद् हिमालयाचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे या रांगेत जगातील सर्वात उंच शिखरे आहेत. यातील बरीचशी शिखरे ही ८००० मी. पेक्षा जास्त आहे. या रांगेमध्ये जगातील सर्वात उंच शिखर मांऊट एव्हरेस्ट आहे. या रांगेतील अन्य शिखरे उतरत्या क्रमाने १) एव्हरेस्ट, २) कांचनगंगा, ३) मकालू, ४) धवलगिरी, ५) अन्नपूर्णा, ६) नंदा देवी, ७) कामेत, ८) नामच्या बरवा, ९) गुरला मंधता, १०) बद्रीनाथ
लेसर हिमालय/मध्य हिमालय ((Lesser or Middle Himalaya) : मध्य हिमालयालाच हिमाचल, हिमालया असे देखील संबोधले जाते. दक्षिणेकडील शिवालीक रांगा व उत्तरेकडील बृहद् हिमालय या दोघांना समांतर असा, लेसर हिमालय पसरलेला आहे. लेसर हिमालयाची रचना ही गुंतागुंतीची असून, या पर्वताची सरासरी उंची ३५०० ते ५००० मी. यांदरम्यान आहे. लेसर हिमालयात पुढील रांगांचा समावेश होतो.
१) पीरपंजाल, २) धौलाधर, ३) मसुरी व नागतिब्बा, ४) महाभारत
१) पीरपंजाल : काश्मीरमधील ही सर्वात लांब रांग असून हिचा विस्तार
झेलमपासून उध्र्व बियास नदीपर्यंत सुमारे ४०० किमीपर्यंतचा आहे. रावी नदीच्या आग्नेयकडे ही रांग पुढे धौलाधर म्हणून ओळखली जाते.
२) धौलाधर रांग : पीरपंजाल रांग पूर्वेकडे धौलाधर या नावाने प्रसिध्द आहे. ही रांग पुढे धर्मशाळा व सिमलामधून जाते.
३) मसुरी, नागतिब्बा रांग : लेसर हिमालयाच्या पूर्वेकडे जाताना फक्त काही रांगाच स्पष्टपणे ओळखल्या जातात. यांपकी मसुरी आणि नाग तिब्बा या रांगा आहेत.
४) महाभारत रांग : मसुरी रांग पुढे नेपाळमध्ये महाभारत रांग म्हणून ओळखली जाते.
महत्त्वाच्या खिंडी : पीरपंजाल, बिदिल खिंड, गोलाबघर खिंड, बनीहल खिंड
महत्त्वाची थंड हवेची ठिकाणे : लेसर हिमालयात सिमला (हिमाचल प्रदेश), मसुरी, राणीखेत, ननिताल, अल्मोडा ( उत्तराखंड), दार्जिलिंग 
( पं.बंगाल).
महत्त्वाच्या दऱ्या :
१) काश्मीर दरी : पीरपंजाल व मुख्य हिमालयाच्या झास्कर रांगेदरम्यान ही प्रसिध्द काश्मीर दरी आहे. काश्मीर दरीची लांबी सुमारे १३५ किमी तर रूंदी सुमारे ८० किमी इतकी आहे.
२) कांग्रा दरी : हिमाचल प्रदेशातील ही दरी धौलाधर रांगेच्या पायथ्यापासून बियास नदीच्या दक्षिण भागापर्यंत पोहोचलेली आहे.
३) कुलू दरी : रावी नदीच्या उध्र्व प्रवाहात कुलू दरी आहे. 
४) काठमांडू दरी : नेपाळमध्ये महाभारत रांगेच्या उत्तरेस काठमांडू दरी आहे.
शिवालीक रांगा / बाहय़ हिमालय (Outer Himalaya) : हिमालय पर्वताच्या सर्वात बाहेरील रांग ही शिवालीक रांग आहे. या रांगेलाच बाहय़ हिमालय असे म्हणतात. हिमालयाच्या इतर रांगेच्या उत्पत्तीनंतर शिवालीक टेकडय़ांची निर्मिती झाल्याने हिमालयातील नद्यांनी वाहून आणलेला गाळ या ठिकाणी साठत गेला व येथे सपाट मदानी प्रदेशाची निर्मिती झाली. यालाच डून ((Doon) असे म्हणतात उदा. डेहराडून (उत्तराखंड), उदमपूर व कोटला (जम्मू व काश्मीर)......

यशाचा मूलमंत्र

यशाचा मूलमंत्र
आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहायला हवे, जीवनाला सकारात्मक वळण द्यायला हवे.
"मेहनत" हाच मानवाचा खरा अलंकार आहे हे सत्यात उतरवा, मानवाच्या चारित्र्याला आकार देणारा कुंभार म्हणजे "मेहनत" आहे.
“मेहनतीला हुशारीची गरज नसते” हेच एकमेव समीकरण आहे जीवनात यशस्वी होण्याचं. पण आज, आम्ही जिवंत हाडा मासाची माणसं, सक्षम माणसं, हात पायाने कणखर असलेली माणसं, परीस्थितीशी हरतो आहे, हि किती मोठी शोकांतिका आहे. जणू आमच्यातून मेहनत हा शब्दच हरवला आहे असली अवस्था घेऊन आम्ही समाजात वावरत आहोत. सदैव नशीब आणि जोतीश्याच्या भाकितावर स्वतःच्या आयुष्याची उंची पाहणारे आम्ही काय मेहनत करणार. “नशीब“ ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे आपणच आपली मेहनतीपासून केलेली सुटका होय, अपयश आल्यावर आपणच आपल्या मनाची केलेली समजूत म्हणजे नशीब.
नशिबाची खरी व्याख्या म्हणजे,
एखादा माणूस, दिन रात कष्ट करतो, मेहनत करतो, अनेक संकटाना तोंड देतो, परीस्थितीशी लढा देतो, झोप विसरतो, सुखं त्यागतो, अनेक दुखं झेलतो आणि जेव्हा तो यशस्वी होतो तेव्हा लोक म्हणतात, खरचं “नशिबवान” आहे तो. पण त्याच्या यशाच्या मागे हि सारी मेहनत त्याने घेतलेली असते हे मात्र आम्ही विसरतो आणि फक्त म्हणत असतो नशीबवान आहे तो.
हि आहे नशीबाची खरी व्याख्या.
आम्ही केलेली नशिबाची व्याख्या म्हणजे,
आम्ही मेहनतीला बगल देऊन यशस्वी होण्याचे स्वप्न पाहतो आणि त्यात अपयश पदरी आले कि, आमच्यात नशीब ह्या शब्दाचा जन्म होतो आणि आम्ही म्हणतो कि माझ्या नशिबातच नव्हते ते.
हि आहे आम्ही केलेली नशीबाची व्याख्या.
माणूस कर्तव्याने मोठा होत असतो वयाने नाही. हात नसलेले, पाय नसलेले, शारीरिक अपंगत्व असलेले जिद्दी, मेहनती व्यक्ती पाहिले कि, मनात प्रश्न येतो कि, आपल्याजवळ सक्षम शरीर असतांना सुद्धा आम्ही जीवनात यशस्वी होण्याकरिता कुठे कमी पडतो आहे ते.
का आम्ही यशाची उंची गाठू शकत नाही...??
आपल्याला काय कमी दिलंय निर्मात्याने.
निर्मात्याने आम्हाला डोकं दिलय सुपीक विचारांचा संग्रह करण्यासाठी आणि बुद्धीच्या जोरावर जीवनात यशस्वी होण्यासाठी. पण आम्ही डोक्याचा वापर हा फक्त त्यावर असलेल्या केसांचा भांग (Hair style) पाडण्याकरिता करत आहोत आणि बुद्धिमत्तेला विसरून नशीबावर आशा ठेवत आहोत.
निर्मात्याने आम्हाला मुख दिलय ते सुंदर वाणीकरिता. पण आम्ही मुखाचा वापर शिव्यांचा साठा करण्याकरिता आणि याची अडवा त्याची जिरवा ह्या दहा कलमी उद्योगासाठी करत आहोत.
निर्मात्याने आम्हाला कणखर हात (बाहू) दिलेय ते आपल्या हाताने मेहनत करून जीवनात आपले स्थान निर्माण कण्यासाठी, आपल्या हातून सुंदर कार्य घडण्यासाठी आणि परमार्थ करण्यासाठी. पण आम्ही हाताचा वापर दारूचा प्याला धरण्यासाठी करत आहोत, आई बापाने कमावलेला घामाचा पैसा ह्याच हाताने सिगारेट च्या धुव्यात विलीन करत आहोत.
निर्मात्याने आम्हाला पाय दिलेय ते जीवनात यशाचे अंतर गाठायला, धावत्या युगात धावायला. पण आज आमचे पाय धावायला कधीच विसरले आहेत, तर ते कुठून यशाच्या मार्गावर धावतील, इतकी दयनीय परीस्थिती झाली आहे आमची.
जिद्द आणि मेहनत यांचा संगम घडून आला कि, जगातल्या सर्व अशक्य गोष्टी शक्य होतात.
आम्हाला एखादी गोष्ट मिळाली नाही किंवा आई वडीलांनी आमचा हट्ट पूर्ण केला नाही तर आम्ही नाराज होतो आणि त्याचं दुखं करतो. पण शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्ती जन्मताच शरीराचा अवयव हरवलेल्या असतात, तर त्यांच्या इतके दुखं कुणाचे असावे..??
पण ते परीस्थितीशी हरत नाही तर लढत राहतात आणि जिद्द ठेऊन व मेहनत करून आयुष्याला आकार देत असतात.
पुन्हा सांगतो,
मेहनतीला हुशारीची गरज नसते हेच एकमेव समीकरण आहे जीवनात यशस्वी होण्याचं.

जिंदगी

जिंदगी में 
हमेशा उड़ने की कोशिश कीजिऐ...
.
उड़ नही सकते 
तो दौड़ने की कोशिश कीजिऐ...
.
दौड़ नही सकते
तो चलने की कोशिश कीजिऐ...
.
चल नही सकते
तो खिसकने की कोशिश कीजिऐ...
.
.
क्योंकि एक स्थान पर रहकर
आप 
जिंदगी में आगे नही जा सकते..!! 
~~ यही जीवन का सच है ~~ 

मार्क'म्हणजेच गुणवत्ता नाही

अतिशय सुरेख आणि सुज्ञ पालकांसाठी
डोळे उघडणारा हा झणझणीत लेख ::::
••••••••••••••••••••••••••••
'मार्क'म्हणजेच गुणवत्ता नाही.....!
- डॉ. अरुण नाईक, (मानसोपचारतज्ञ)
नुकतीच एक बातमी वाचली....
नेहमी चांगले मार्क मिळवणाऱ्या मुलीला दहावीचा पहिला पेपर चांगला नाही गेला.संध्याकाळी तिने आत्महत्या केली. अजून परीक्षाही संपली नाही.पण मुलगी संपली.
मागे एका मेडिकलच्या विद्यार्थ्यांने शेवटच्या वर्षांला गोल्ड मेडलऐवजी सिल्वर मेडल मिळाले, म्हणून आत्महत्या केली होती.
माणूस मरायला घाबरत नाही,
पण किंमतशून्य जगायला घाबरतो.
एका नामांकित शाळेच्या स्कॉलर वर्गातील मुलांशी बोलताना मी त्यांना विचारले की,"सर्वजण त्यांना
काय म्हणतात?"मुले म्हणाली, कि 'स्कॉलर'.
मी विचारले 'का?', मुले म्हणाली, कारण आम्हाला
चांगले मार्क मिळतात.मी समीकरण मांडले.
'अ = ब' व 'ब = क'
त्याअर्थी 'अ = क'.
म्हणजेच,
'मी = स्कॉलर' व 'स्कॉलर = मार्क'.
याचा अर्थ 'मी = मार्क'....!
जेव्हा आपण आपली किंमत मार्कावरून करायला लागतो,
तेव्हा जरा मार्क कमी मिळाले की,आपली किंमत कमी झाली असे वाटते.
सर्व परीक्षा बोर्डानी मार्क वाटायला सुरुवात केल्यापासून तर हे समीकरण पालक व मुले यांच्या डोक्यात गच्च बसायला लागले आहे. हे धोकादायक आहे...!
माझी भाची शाळेतही जात नसताना तिने काढलेल्या एका
चित्राला मी 'वा' म्हटले.
ती लगेच म्हणाली-मार्क दे.
मी चित्राच्या बाजूला लिहिले 'छान'.
ती म्हणाली मार्क दे. शंभरपैकी.
अडूनच बसली.शाळेत जायच्या आधीपासूनच हे
डोक्यात शिरत आहे. हे आजूबाजूच्या वातावरणात आहे.
या विषारी वातावरणाने वरील बळी घेतले आहेत.
जेव्हा कधी पालकांना विचारले की,
तुमच्या मुलांबाबत काय व्हावे असे तुम्हाला वाटते?
तेव्हा हमखास उत्तर येते की,
तो चांगला नागरिक बनावा, चांगला माणूस बनावा.
जरा विरोधाभास पाहूया...!
मेडिकलच्या विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांनी सांगितले की
त्यांना चांगला डॉक्टर बनायचे आहे.
मी विचारले चांगला डॉक्टर कोणाला म्हणता?
तर मुले म्हणाली की, जो जास्तीत जास्त लोकांना चांगल्यात चांगला उपचार देऊन बरा करतो तो..!
सिल्वर मेडल मिळालेल्या त्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांलाही चांगला डॉक्टर बनायचे असेलना?
पण बनला का? त्याच्या आधीच गेला.
चांगला नागरिक,चांगला माणूस, चांगला डॉक्टर व चांगला व्यावसायिक आपण जेव्हा काहीतरी चांगले करतो
तेव्हा बनतो. नुसत्या मार्कानी नाही बनत.
एका नववीतील मुलीला चाचणी परीक्षेत गणितात वीसापैकी १४ मार्क मिळाले म्हणून तिने आत्महत्येचा
प्रयत्न केला.
माझ्याशी बोलताना तिचे पहिले वाक्य होते की,
'आय एम युझलेस'...!
या मुलीलादहावीनंतर क्रीडा पत्रकार बनायचे आहे. त्यासाठी ती कलाशाखेला जाणार आहे.
मी विचारले की आर्ट्सला गणित असते का?
ती म्हणाली 'नाही'. मी म्हटले की याचा अर्थ तू
दहावीनंतर गणिताला टाटा करणार,
मग तू गणितासाठी जीव का देत होतीस?
हे ऐकल्यावर तिलाही हसू आले.
काय आहे की 'गुणी मुलगी','भावंडात हुशार मुलगी',
'सर्वाची आवडती','९०% मिळायला हवेत हं'.
या इतरांच्या मनातील प्रतिमेला जपण्याचे तिला दडपण आले होते.
ही प्रतिमा आपण जपू शकलो नाही तर आपण युझलेस..!
मुलांमध्ये खूप क्षमता असते,परंतु मार्कावर लक्ष केंद्रित
केल्यामुळे त्या क्षमतांना 'किंमत' दिली जात नाही.
आज जग जवळ आले आहे. अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत.
पालकांनी लक्षात घ्या की, हे लक्षात न आल्यामुळे जेव्हा
मुलांना कमी मार्क मिळतात तेव्हा आपण नकळत हिंसक होतो.मुलांच्या आत्मविश्वासावर घाला घालतो.
मार्कावरून मुलांची किंमत किंवा लायकी ठरवू नका.
आपण जन्माला आलो ही एकच गोष्ट आपण जगायला लायक आहोत यासाठी पुरेशी आहे.
आता जगताना काय करायचे याचा विचार करूया.
'थ्री इडियट' सिनेमातील मुलाखतीच्या प्रसंगात आजवर मार्कावरूनआपली किंमत ठरवणारा, घाबरणारा मुलगा म्हणतो,'जिंदगी में कुछ तो ठीकठाक कर ही लूंगा'..!
हा आत्मविश्वास मुलांना द्या!

Reference: https://www.facebook.com/officialsharyat?fref=nf

छत्रपती शिवाजी महाराज यांची बसण्याची जागा

किल्ले- राजगड.
छत्रपती शिवाजी महाराज यांची बसण्याची जागा पुर्वी याच ठिकाणी असे.. अशी माहिती मिळाली..
तसेच या खाली तळघर देखील आहे.
निदान या ठिकाणी व्यवस्थित पणे सरकारने अथवा पुरातत्व विभागाने दखल घ्यावी..
ज्या ठिकाणी महाराजांची बसण्याची जागा अथवा आसन असेल निदान त्याठिकाणी त्यांचे मंदिर बांधावे अस मनात आले.
फक्त सिंधुदुर्ग येथेच एकमेव महाराजांचे मंदिर आहे..
प्रत्येक किल्ल्यावर बांधल्यावर महाराजांचे मंदीर बांधल्यावर लोकांचा पहाण्याचा आणि संवर्धनाचा द्रुष्टिकोन राहतो.
नसत्या भटकेदार व दारू पिणार्यांवर देखील दरारा राह्तो..
शिवाजी महाराज आणि सम्भाजी महाराज हे आपले दैवत आहे.
ज्या प्रत्येक किल्ल्यावर महारांचे बसण्याचे आसन अथवा जिथे त्यानी प्रजेला न्याय दिला. ती जागा वंदनीय आहे. तिथे महाराजांचे मंदीर बांधावे ही एक महत्वाची भुमिका ठरू शकते.
Reference facebook.. The great maratha warriors page.

● भारतीय राज्य घटने संबंधित थोडक्यात ●

१. घटना समितीची पहिली बैठक :- ९ डिसेंबर, १९४६.
२. घटना समितीच्या निवडणुका :- १९४६.
३. समिती सदस्यांची निवड : - प्रांतिक मंडळामार्फत. ( अप्रत्यक्ष पद्धतीने )
४. सुरुवातीचे सभासद संख्या : - ३८९ .
५. नंतरची सभासद संख्या : - २११.
६. उपस्थित सभासद संख्या : - २०७.
७. पहिल्या बैठकीचे अध्यक्ष : - सच्चिदानंद सिन्हा.
८. मसुदा समितीचे अध्यक्ष : - डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
९. घटना समितीचे अध्यक्ष : - डॉ. राजेंद्र प्रसाद .
१०. निर्मिती प्रक्रियेस सुरवात : - २९ ऑगस्ट.
११. महत्वाचे सभासद : - सरदार पटेल, बी.जी.खेर, अबुल कलम आझाद, पं.नेहरू, जी.बी.पंत, के.एम.मुन्शी, एच.एन.कुंझरू, पी.टी.tandon, डॉ.राजेंद्र प्रसाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सच्चिदानंद सिन्हा, एम.आर..मसानी, जे.बी.कृपालानी, एस.राधाकृष्णन, ख्वाजा नजीमुद्दिन, एच.एस.सुह्रावर्दी, रत्नाप्पा कुंभार.
१२. घटना समितीचे कायदेशीर सल्लागार : - डॉ. बी.एन.राव.
१३. घटना निर्मितीचा काळ : - २ वर्षे ११ महिने १८ दिवस .
१४. घटनेची पूर्तता : - २६ नोव्हेंबर, १९४९.
१५. घटना लागू : - २६ जानेवारी, १९५०.
१६. राज्य घटनेची गुरुकिल्ली : - उद्येश्पत्रिका.
१७. घटनेचे वैशिष्ट्ये : - अंशत: परिवर्तनीय व अंशत: अपरिवर्तनीय.
१८. सरनाम्यातील पाच शब्दांचा क्रम : - सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य.

Tuesday, 25 March 2014

प्रति तानाजी, प्रति बाजिप्रभू



सरसेनापती नेताजी पालकर यांना प्रति शिवाजी म्हणत असत हे सर्वांना माहीत आहे परंतू प्रति तानाजी आणि प्रति बाजिप्रभू फारसे कोणाला माहीत नाहीत म्हणून हा खटाटोप!

तानाजी मालूसरे यांनी रात्रीच्या अंधारात कडा चढून जाऊन किल्ले सिंहगड सर केला होता त्याचप्रमाणे कानोजी (का कान्होजी) यांनी किल्ले पन्हाळा सर केला होता. आनंदराव मकाजी आणि कानोजी हे दोघे पन्हाळा सर करावयाला गेले होते. सिद्दी जोहर ला पन्हाळा द्यावा लागला हे शल्य शिवरायांना सारखे सलत होते! त्यामूळे ही मोहीम हाती घेण्यात आली होती. आधी ठरल्याप्रमाणे कानोजीने कडा चढून जायाचे आणि आनंदराव मकाजी यांनी खालून ह्ल्ला चढवायचा व गड सर करायचा असा बेत ठरला होता. परंतू कानोजी ने ती वेळच येऊ दिली नाहि. फक्त ६० लोकांना घेऊन कानोजी कडा चढून वर गेले, आणि किल्ल्यावर चहूकडे पसरले, चहुबाजूने एकदम कर्णे वाजवून त्यांनी "हर हर महादेव" अशी गर्जना करून एकच हल्ला बोल केला. गडावर त्यावेळी जवळ जवळ १५०० अदिलशाही शिबंन्दी होती. परंतू ते इतके गोंधळून गेले की फक्त ६० लोकांना ते सरळ शरण आले! ६० मावळ्यातील एकही मावळा दगावला नाही! ६० लोकांनी १५०० च्या फौजेचा पराभव केला!

बाजिप्रभूंनी ज्याप्रमाणे ३/४ तास पावनखिंड अडवून ठेवली होती त्याप्रमाणे रामजी पांगारा यांनी चांभारगडाजवळ दिलेरखानाला अडवून ठेवले होते! प्रतापराव गुजर आणि मोरोपंत साल्हेर गडाला वेढा घालून बसले होते. साल्हेर हा बागलाणातील अत्यंत महत्वाचा किल्ला होता. मोठी फौज वेढा घालून बसली होती, दिलेरखानाला ही गोष्ट कळल्यावर तो बर्हाणपूर हून मोठी फौज घेऊन वेढा मोडून काढण्यासाठी निघाला. वाटेत त्याला दुसरा मुरारबाजी भेटला! रामजी पांगारा तेंव्हा चांभारगडाचे किल्लेदार होते, गडावरील ६०० मावळे दिलेरखानाला अडवायला गडाजवळील खिंडीत दबा धरून बसले! दिलेरखानाला त्यांनी तसूभरही पूढे सरकू दिले नाही! सर्व ६०० मावळे कामी आले!